फ्रान्समध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका मातेने आपल्या 13 वर्षीय मुलीला उपाशी ठेवून मारल्याने तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मृत्यूपूर्वी तिच्या मुलीचे वजन केवळ 28 ग्रॅम एवढे होते. तिने असे का केले याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
वैद्यकीय अहवालानुसार,सॅण्डरीन पिस्सारा असे त्या माथेफिरू महिलेचे नाव असून अमांडाइन असे मुलीचे नाव आहे. मृत्यूवेळी अमांडाइन चेहरा सूजलेला दिसत होता, अनेक दात पडलेले होते, शरीरावर अनेक जखमा होत्या आणि केस ओढलेले होते. तिचे वजन केवळ 28 ग्रॅम होते, तिला सेप्टिसिमिया हा जीवघेणा आजार झाला होता.
आऊटलेटच्या वृत्तानुसार, अमांडाइनला अनेक दिवस स्टोरेज रुममध्ये बंद करुन तिला उपाशी ठेवण्यात आले होते. त्या खोलीत फारशा खिडक्या नव्हत्या. अमांडाइनच्या आईने सॅण्डरीन तिच्या मुलीसोबत अमानुश वागत असल्याचे न्यायलयाने सांगितले. मुलीचा मानसिक छळाबरोबर शारीरीक छळही करण्यात आला. तिच्या आईने नंतर ती वडिलांसारखी दिसत असल्याने तिचा छळ केल्याचे न्यायालयात कबूल केले.