
कुटुंब म्हटल की भांड्याला भांड हे लागतच, बऱ्याच वेळा या भांडणांमध्ये सर्व राग लहान मुलांवर काढला जातो. रागाच्या भरात आई वडिलांकडून लहान मुलांना बेदम चोपलं जात. परंतु हाच राग चार वर्षीय मुलीच्या जीवावर बेतला आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटना मुंबईतील कुर्लामध्ये घडली आहे. परवेज सिद्दीकी असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परवेज सिद्दीकी याचे काही कारणांवरून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने प्रथम पत्नीला मारहाण केली आणि नंतर तोच राग चार वर्षांची पोटची मुलगी अफिया सिद्दीकीवर काढला. त्याने मुलीला उचलून जमीनीवर फेकले. त्यामुळे अफिया गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालायत नेल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी विनोभा भावे नगर पोलिसांनी आरोपी परवेज सिद्दीकीली ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. IANS ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.