
उत्सवासाठी घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून दाजीने विवाहित मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. डोके दुखत असलेल्या मेहुणीला गुंगीच्या गोळ्या खाण्यास देऊन तिच्यावर जबदरदस्तीने बलात्कार केला आहे. याप्रकरणी १८ वर्षांच्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून 36 वर्षीय दाजीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या घरातील लोक दि. 3 ते 12 ऑक्टोबर 2024 कालावधीत नवरात्रीनिमित्त यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी तिचा दाजी घरी होता. तरुणीचे डोके दुखत असल्याचे दाजीला सांगितले होते. त्यावेळी दाजीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून मेहुणीला दोन गोळ्या खायला दिल्यामुळे तिला गुंगी आली. त्याचदिवशी संधीचा फायदा घेऊन आरोपीने मेहुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
तू आपल्यामध्ये झालेल्या शारीरिक संबंधाबद्दल कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. शारीरिक संबंधाचे चित्रीकरण तरुणीच्या सासरी व पतीला दाखवून तिच्या पतीला शिवीगाळ करत भांडणे केली.
तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी
तरुणीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी तरुणाने दबाव टाकला. ‘माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझे लग्न होऊ देणार नाही,’ अशी धमकी देणाऱ्या तरुणावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे 2024 ते 15 एप्रिल 2005 दरम्यान घडली. आरोपीने तरुणीला लग्न न केल्यास तिचे फोटो इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ‘तुझ्या घरी येऊन विष पिऊन जीव देईन, नाहीतर करंट लावून घेतो,’ असेही त्याने धमकाविल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.