मुकेश अंबानींना धमकीचा मेल करणाऱ्या दोघांवर आरोपपत्र दाखल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल दिल्याप्रकरणी दोघा महाविद्यालयीन तरुणांविरोधात आरोपपत्र करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खंडणी, गुन्हेगारी धमकी आणि आयपीसी अंतर्गत पुरावे नष्ट करणे, तसेच आयटी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे. जगतसिंग खंत (20) आणि गणेश वनपर्थी (19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका आरोपीला गुजरात आणि एकाला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. दोघांनी मुकेश अंबानी यांना मेल पाठवून मोठ्या रकमेची मागणी केली होती.

आरोपींनी आधी 20 कोटी, नंतर 400 कोटी आणि 500 ​कोटी रुपयांची मागणी करणारे वेगवेगळे धमकीचे ईमेल मुकेश अंबानी यांना पाठवले होते. जगतसिंग खंत हा गुजरात पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा असून वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात शिकतो. लोकेशन कळू नये म्हणून व्हीपीएनवरुन “कॅच मी इफ यू कॅन,” असा मेल पाठवून खंतने पोलीस प्रशासनाला आव्हान केले होते. तर, वानपर्थी हा वारंगल येथील रहिवासी असून, कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे.