
काल पहलगाम अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना मुंबई आणि हैदराबादच्या सर्क खेळाडूंसह संघ व्यवस्थापन, सहकारी स्टाफ, सामन्यातील पंच, सामनाधिकारी आणि समालोचकांनी दंडाला काळ्या फिती बांधून श्रद्धांजली वाहिली. त्याच्यासोबत सामना पाहायला आलेल्या हजारो प्रेक्षकांनीही एक मिनीट मौन पाळून आपल्याही भावना व्यक्त केल्या. तसेच देशावर ओढावलेल्या दुखामुळे आज सामन्यादरम्यान खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी चीअरलीडर्स दिसल्या नाहीत. त्याचप्रमाणे विजयानंतर होणारी आतषबाजीही करण्यात आली नाही.