सध्याच्या काळात क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. क्रेडिट कार्ड युजर्सची संख्याही वाढत आहे. खासकरून फेस्टिवल सीझनमध्ये क्रेडिट कार्डचा अधिक वापर होतो. क्रेडिट कार्डवरून नेमकी कुठे खरेदी केली जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डवर मिळणाऱया कॅशबॅक ऑफर तसेच ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करणाऱयांची संख्या वाढली आहे. क्रेडीट कार्ड वापरणाऱया युजर्सपैकी 80 टक्के जणांनी फेस्टिवल सीझनमध्ये खरेदी केली आहे.
– क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱयांपैकी 48 टक्के लोकांनी ऑनलाईन माध्यमातून खरेदी केली. फक्त 7 टक्के लोकांनी शॉपमध्ये जाऊन खरेदी केली.
– पेमेंट केल्यावर रिवॉर्ड पॉईंटही मिळतात. त्यामुळे ऑफलाईनच्या तुलनेत ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले जाते. क्रेडिट कार्डची सेवा देणाऱया कंपन्यांची मोठी भूमिका आहे.