वकिलांनी योग्य पोशाखातच न्यायालयात आले पाहिजे असे सांगत सर्वोच्च न्यायालयात जीन्स पॅन्ट घालून आलेल्या वकिलाला न्यायालयाने चांगलेच सुनावले. गुवाहाटी न्यायालयाने जीन्स घालून आलेल्या वकिलाला निलंबित केले होते. त्या निर्णयाविरोधात या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेही वकिलाला सुनावले. हायकोर्टात याचिकाकर्ते वकील बी. के. महाजन जीन्स घालून आले होते. याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना बोलावले आणि या वकिलांना पोलिसांकरवी बाहेर काढले. यानंतर या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी अलाहाबाद कोर्टात असे प्रकरण समोर आले होते. वाराणसीच्या सिंचन विभागाच्या इंजिनीअर विजय कुमार कुशवाहा हायकोर्टात जीन्स घालून गेले होते. त्यावेळी त्यांना 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आदेशात असे म्हटले आहे बी. के. महाजन यांनी केलेले कृत्य योग्य नाही. महाजन हे सातत्याने जीन्स घालून कोर्टात येत होते असेही निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण लक्षात आले त्यानंतर पोलीस बोलावून त्यांना बाहेर नेण्यात आले. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आली.