भगवा ध्वज फडकविल्याने आलेल्या समन्सनुसार शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे हे आज बेळगाव न्यायालयात हजर झाले. येत्या 19 फेब्रुवारी रोजी जामीन देण्याच्या अटीवर सोडण्यात आले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक चळवळीच्या लढय़ाचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कोणेवाडी येथे मराठी स्वराज्याचे प्रतीक असणारा भगवा झेंडा फडकल्याप्रकरणी कानडी पोलिसांनी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्यावर गुन्हे दाखल केले होते, तर या दोघांना आज बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले होते.