
13 कोटींहून अधिक रुपयांच्या सोन्याच्या 16 बिस्किटांच्या तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तुर्किश नागरिकांचा जामीन अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. बेकीर एकमेन व सिनन कोमुर्पु अशी आरोपींची नावे असून दोघांना 25 जानेवारी रोजी अटक केली होती. महसूल गुप्तचर संचालनालय तस्करीच्या गुह्याचा तपास करीत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल न्यायालयाने घेतली आणि आरोपींना जामिनावर सोडल्यास तपासावर परिणाम होईल, असे निरीक्षण नोंदवत दोघांचा जामीन अर्ज फेटाळला.