
मागणी बाबा सिद्दिकी यांच्या पत्नी शेहजीन यांनी सत्र न्यायालयाला केली आहे. याप्रकरणी शेहजीन यांनी न्यायालयात मध्यस्थी अर्ज केला असून न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेतला आहे.
बाबा सिद्दिकी यांची गेल्या वर्षी वांद्रे येथे लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्या केली होती. या हत्या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. सत्र न्यायालयात याबाबतचा खटला सुरू असून शनिवारी बाबा सिद्दिकी यांची पत्नी शेहजीन यांनी न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, सिद्दिकी यांच्या निधनामुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या खटल्यात खरी माहिती व तथ्ये सादर करण्याची मागणी त्यांनी अर्जाद्वारे न्यायालयाला केली आहे. मकोका कोर्टाचे विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा अर्ज दाखल करून घेतला आहे.