प्रेमी युगुलांमधील ब्रेकअपसाठी जबाबदार आहेत ‘या’ सवयी

नातं कोणतंही असो नात्यांमध्ये एकमेकांविषयी आदर आणि विश्वास असेल तर नातं हे उत्तम टिकतं. सध्याच्या घडीला गर्लफ्रेंड आणि बाॅयफ्रेंड यांच्यातील ब्रेकअप हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे. क्षुल्लक कारणांवरुन ब्रेकअप होताना आपण आजूबाजूला खूपदा पाहतो. नात्यांमधील कोणत्या गोष्टी या ब्रेकअपला कारणीभूत ठरतात याची पडताळणी ही प्रत्येकाने करुन बघायला हवी. नात्यामधील कोणत्या गोष्टी ब्रेकअप होण्यास कारणीभूत ठरतात याचा विचार केल्यास, आपण या गोष्टी खूपदा का होईना टाळू शकतो. आज आपण याच गोष्टींवर नजर टाकणार आहोत.
ब्रेकअप होण्यासाठी कारणीभूत असणारे महत्त्वाचे मुद्दे
सतत काॅल आणि मेसेज करणे
एखाद्याला सतत काॅल आणि मेसेज केला तर, समोरची व्यक्ती कंटाळते. सतत काॅल आणि मेसेज केल्यामुळे समोरची व्यक्ती कंटाळते. आपल्या पार्टनरविषयी असलेली अस्थिरता आणि अविश्वास सतत काॅल आणि मेसेज करण्यास भाग पाडतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांना काॅल करुन तू कुठे आहेस हे विचारणेही नातेसंबंधात बिघाड निर्माण करु शकते.
संशयी वृत्ती
कोणत्याही नात्यामध्ये संशय निर्माण झाला की, त्या नात्याचा पाया हा डळमळीत होतो. संशय हे नात्यामध्ये विष कालवण्याचे काम करतो. तिथेच अनेक नाती तुटतात. त्यामुळे तुम्ही जोडीदाराविषयी एखादी गोष्ट ऐकल्यास ती खातरजमा करुन घ्या. संशयाची बीज एकदा मनात निर्माण झाले की, भली भली नाती तुटतात.
नाटकी स्वभाव
अनेक कपल्समध्ये नाटकी स्वभवामुळेही ब्रेकअप होण्याचे पाहायला मिळते. उगाचच ओढून ताणून एकमेकांना त्रास देण्यात काहीच अर्थ नसतो. काही गोष्टी न ताणता त्या सुटू शकतात. परंतु काही कपल्स मात्र गोष्टी अधिक ताणतात त्यामुळेच ब्रेकअप होतो.
अपेक्षांचे ओझे
नात्यामध्ये अपेक्षा निर्माण झाल्या की, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी अपेक्षा बाळगाल आणि त्या पूर्ण न झाल्यास, नाराज व्हाल. त्यापेक्षा अपेक्षांचे ओझे बाळगू नका. अपेक्षा न बाळगल्यास नात्यांमध्ये मॅच्युरिटी निर्माण होते. अपेक्षांच्या ओझ्याखाली माणूस मोकळेपणाने जगू शकत नाही.
सार्वजनिक ठिकाणी वाद
भर रस्त्यात भांडणारी जोडपी ही चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भांडणे म्हणजे नात्यातील वाद चव्हाट्यावर आणणे असे होते. कोणत्याही नात्यामध्ये मुद्दे इतके विकोपाला जाऊ नयेत की, त्याची चर्चा आणि भांडणे भर रस्त्यामध्ये होतील.
नातं टिकवणं ही जबाबदारी कुणा एकाची नाही, तर नातं टिकवण्यासाठी दोघांच्याही अंगी समजूतदारपणा असणे गरजेचे आहे.