Nagpur News : कारच्या स्टिअरिंगवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई

नागपुरात एका तरुणाचा कार चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणासोबत त्याची एक मैत्रिणही आहे. हे दोघेही चालत्या गाडीत अश्लिल चाळे करत होते. दरम्यान, रस्त्यावरून इतर वाहनांतून प्रवास करणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सदर घटना 15 जुलै रोजी घडली आहे. सूरज राजकुमार सोनी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने सीए असल्याचे सांगितले जाते. सूरज रस्त्यावर कार चालवत होता. यावेळी त्याच्या सोबत असलेली त्याची मैत्रीण ड्रायव्हिंग सीटवर त्याच्याजवळ आली आणि अश्लील चाळे करू लागली. हा सर्व प्रकार आजूबाजूच्या इतर वाहनांमध्ये असलेल्या लोकांनीही पाहिला.

दरम्यान यापैकी एका प्रवाशाने या दोघांचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. लोकांनी या अश्लील प्रकाराचा निषेध केला. व्हायरल व्हिडिओनंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारच्या क्रमांकाच्या मदतीने मालकाचा शोध घेतला. तसेच कारचालक सूरज आणि त्याच्या मैत्रिणीवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.