जगातील सर्वात मोठे आणि वेगवान सर्च इंजीन गूगलने आज अचानक काम करणे बंद केले. जगभरात अनेक देशांमध्ये गुगल डाऊन झाल्याचे चित्र होते. जीमेल सर्च इंजिनबद्दल असंख्य तक्रारी आल्या. सोशल मीडिया यूजर्सना जीमेल, युटयूब आणि अन्य ऑनलाइन सेवांमध्ये अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, तक्रारींनंतर नेमका काय प्रॉब्लेम आहेत याबाबत शोध घेऊन अडचणी दूर करण्यात आल्या.
अमेरिका, ब्रिटन, युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ऑनलाइन सर्चिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जीमेल आणि यूट्यूब वापरण्यात सर्वात जास्त अडचणी अमेरिकेतील लॉस एंजेलोस आणि न्यूयॉर्क येथे आल्या. ह्युस्टन, सॅन फ्रान्सिस्को. डलास, बोस्टन आणि शिकागोमध्येही काही ठिकाणी ऑनलाइन सेवेत अडचणी येत होत्या. कार्यालयांमध्ये इंटरनेट डाऊन होते. काम करता येत नव्हते.