कोपोला यांना प्रतिष्ठेचा एएफआय जीवनगौरव पुरस्कार

अमेरिकन फिल्म इन्स्टिटयूटने (एएफआय) दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोपोला ( वय 86) यांना 50व्या एएफआय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा समारंभ रंगला. या समारंभात कोपोला यांच्या अमेरिकन चित्रपटसृष्टीतील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हॉलिवूडमधील दिग्गज एकत्र आले. चित्रपट निर्माते स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जॉर्ज लुकास यांच्या हस्ते कोपोला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.