मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातील 200 वर्षे जुन्या मंदिरात झालेल्या लग्नामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिले. इंदूरमधील राजबाडी भागातील पुरातन गोपाल मंदिरात रविवारी विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळ्याने भाविकांची गैरसोय झाली.
लग्न सोहळ्यानिमित्त मंदिर सजवण्यात आले होते. भोजनाचीही व्यवस्थाही केली होती. लग्नाचे पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उङ्गली. ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिरात लग्न सोहळा आयोजित करण्याची परवानगी मिळालीच कशी, असा सवाल नेटिजन्सनी केला. मंदिरात लग्न सोहळा आयोजित करण्यासाठी श्री गोपाल मंदिर संस्थानला 25551 रुपये दिल्याचेही समजतेय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट यांना आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गोपाल मंदिराचा जिर्णोद्धार 13 कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला आहे. गोपाल मंदिर 19 व्या शतकातील होळकर युगातील आहे. राजमाता कृष्णाबाई होळकर यांनी 1832 साली 80 हजार रुपये खर्चून मंदिर बांधले होते, असे इतिहासकार जफर अन्सारी यांनी सांगितले.