
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मुंबईतील फॅशन वीकमध्ये नुकतीच सहभागी झाली. या वेळी प्रसारमाध्यमांनी तिला पतीबद्दल प्रश्न केला असता तिने उत्तर देणे टाळले. सुनीताने मुलगा यशवर्धनसोबत रॅम्प वॉकही केला. माध्यम प्रतिनिधींनी सुनीताला ‘‘मॅडम, सर कसे आहेत?’’ असा प्रश्न विचारला. प्रश्न कानावर पडताच सुनीता मुलासह तिथून लगेच निघून गेली. या वेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पूर्णपणे बदलले होते.