
‘स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने कोणताही प्रतिकार केला नाही. जे घडले ते अत्यंत शांततेत घडले. त्यामुळे आम्ही काय करायचे?’ असे वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
गृह राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याने बलात्कार प्रकरणातील गांभीर्य त्यांना समजले नाही हे दिसून आले. योगेश कदम हे आज पुण्यात होते. पण स्वारगेट प्रकरणात पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. कदम यांनी सांगितले, ‘पीडित महिलेने आरोपीशी हाणामारी केली नाही. त्यामुळे बसमध्ये बलात्कार चाललाय हे बाहेरच्या लोकांना समजले नाही. सर्व शांतपणे चालत होते. घटना सकाळी सहा वाजता घडली व तक्रार नऊ वाजता केली, तोपर्यंत आरोपी पळून गेला.’
- गृह राज्यमंत्र्यांच्या या असंवेदनशील वक्तव्याचा महिला संघटनांनी निषेध केला. तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.