
ब्राह्मण संघटनांच्या आक्षेपामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेला बहुचर्चित ‘फुले’ चित्रपट अखेर 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. जातीव्यवस्था निर्मुलन आणि स्त्री शिक्षणाकरिता आयुष्य वेचणाऱया महात्मा ज्योतिराव व सावित्रीबाई फुले या दांपत्याच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी केले असून प्रतीक गांधी आणि पत्रलेखा प्रमुख भूमिकेत आहेत.