![Abhishek Verma](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Abhishek-Verma-696x447.jpg)
जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वादग्रस्त आर्म डीलर अभिषेक वर्मा यांनी आज मिंधे गटात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार चिरंजीवी श्रीकांत शिंदे यांच्या मीना बाग येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश आज झाला. भारतात संरक्षण क्षेत्रातील शस्त्रात्रे खरेदी व्यवहारात अभिषेक वर्मा अनेक विवादात सापडलेले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालपृष्ण आडवाणी आणि भाजपने त्यांच्यावर एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याच वर्मा यांना मिंधे यांनी पावन करून घेतले आहे.
कोण आहे अभिषेक वर्मा ?
अभिषेक वर्माच्या कुटुंबाला काँग्रेसची पार्श्वभूमी असून स्कॉर्पियान पाणबुडी खरेदी प्रकरणातील संशयित आहे. 2006 साली भाजपने आरोप केले होते. जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवादास्पद आर्म्स डीलरवर 2012 साली सीबीआयने धाडी टाकल्या होत्या.