18 रुपयांच्या कॅरीबॅगसाठी मोजले 35 हजार

लखनऊच्या व्ही मार्टला ग्राहकांकडून कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे महागात पडले. या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने व्ही मार्टला 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ग्राहकाला कॅरीबॅगचे 18 रुपये परत करण्याचे आदेश दिले. लखनऊमधील व्ही मार्टमध्ये ही घटना घडली. तिथे ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी कॅरीबॅग मागितली. व्ही मार्टने कॅरीबॅग दिली. मात्र त्यासाठी 18 रुपये आकारले. ग्राहकाला हे पटले नाही. त्यामुळे या ग्राहकाने ग्राहक न्यायालयात वकिलामार्फत धाव घेतली होती.