कन्सल्टिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अॅसेंचर’ने कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि प्रमोशन थांबवले आहे. कंपनीचे जगभरात 7 लाख 50 हजार कर्मचारी आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांचे प्रमोशन जूनपर्यंत पुढे ढकलले आहे. या निर्णयाची माहिती कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात ब्लॉग पोस्टद्वारे दिली. साधारणपणे डिसेंबरमध्ये कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन होते. ते आता जूनमध्ये होईल, असे जाहीर करण्यात आलंय. कन्सल्टिंग इंडस्ट्रीतील आर्थिक अनिश्चितता हे कारण असल्याचे सांगण्यात आलंय. ‘अॅसेंचर’च्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.
अॅसेंचर कंपनीने याआधी आर्थिक वर्ष 2023 मध्ये हिंदुस्थान आणि श्रीलंकेतील कर्मचाऱ्यांची पगारवाढ होणार नाही, असे स्पष्ट केलेले होते. व्यवस्थापकीच संचालक अजय विज यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून वार्षिक बोनसमध्ये कपात करण्यात येत असल्याचे सांगितले होते. आता तर कर्मचाऱ्यांचे प्रमोशन पुढे ढकलले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रमोशनही जून 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेय.