
हरयाणातील काँग्रेसची कार्यकर्ती हिमानी नरवाल (22) हिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काँग्रेसने उच्च स्तरीय तपासाची मागणी केली आहे. हिमानी नरवाल ही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेशी जोडलेली होती.
हरयाणामधील संपला बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला. हिमानीची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हिमानीच्या हातावर मेहेंदी देखील आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हिमानी ही काँग्रेसची सक्रीय कार्यकर्ती होती. सोशल मीडियावर तिचे राहुल गांधी, भुपिंदर हुड्डा याच्यासोबत फोटो आहेत. हिमानी राहुल गांधींसोबत त्यांच्या भारत जोडो यात्रेसाठी देखील काम करत होती. तिचे राहुल गांधींसोबत या यात्रेत चालतानाचे फोटो देखील आहेत.