काँग्रेसचे सरकार येताच ते राज्य शाही परिवाराचे एटीएम होऊन जाते. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक राज्य शाही परिवाराचे एटीएम झाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी कर्नाटक, तेलंगणामध्ये मद्यविव्रेत्यांकडून 700 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यातील कृषी विद्यापीठ परिसरात झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी नामोल्लेख टाळून कॉँग्रेस नेत्यांवर टीका केली. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. काँग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत असल्याची टीका करत मोदींनी (पान 1 वरून) अकोल्यामधील सभेतून कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली. पेंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले. महाराष्ट्रातील बंदरासाठी 80 हजार कोटींची तरतूद केली. देशात गरीबांसाठी चार करोड पक्की घरे बनवून दिली. आता आणखी तीन करोड नवीन घरे बनवण्याची सुरुवात केली. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्याची पूर्ती आता सुरू झाली आहे, असे मोदी म्हणाले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही
काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नव्हता. तो पेंद्र सरकारने मिळवून दिला. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे अनेक वर्ष सरकार राहून देखील पाणी समस्या कायम होती. जाती-जातीमध्ये वाद निर्माण करून देशावर राज्य करण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.संविधान
घेऊन फिरणारे ढोंगी
लाल पुस्तक छापणं व त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणं हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे. संविधान घेऊन फिरणारे ढोंगी आहेत, कश्मीरमध्ये पुन्हा 370 कलम लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान पुन्हा कश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते होऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.