
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच कोरटकरने त्याला आर्थिक मदत करणाऱ्यांची नावे घेतली आहेत. प्रतीक पडवेकर, धीरज चौधरी, राजू जोशीसह आणखी दोघांचे नाव चौकशीतून समोर आलं आहे. यातच कोरटकर याला आर्थिक मदत करणारा प्रतीक पडवेकर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करतो, असा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
याचबाबत बोलताना अतुल लोंढे म्हणाले आहेत की, “प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर यांच्यासोबत होते. कोरटकरला जेव्हा अटक झाली तेव्हाही ते सोबत होते आणि कोल्हापूरला त्यांच्यासोबत आले. पण त्यांना का लपून ठेवलं आहे. कोरटकरला खरी मदत कोण करत होतं, हे पुढे का येत नाही. गृहमंत्री यांनी सांगावं आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की, खोटी.”, असं ते म्हणाले आहेत.