भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका! काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम उपनगर ते पालघर, सफाळय़ापर्यंतच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱया बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवत्ते अॅड. धनंजय जन्नरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे 365 खाटांचे भगवती रुग्णालय पुनर्विकासानंतर 1000 खाटांचे होईल असे सांगून प्रत्यक्षात 490 खाटांचे होत आहे. त्यातील केवळ 147 खाटा सामान्य दराने देण्याचा पुटील डाव मनपा प्रशासनाने आखलेला आहे. हा डाव हाणून पाडण्याचे काम महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष करेल, असे प्रतिपादन धनंजय जुन्नरकर यांनी केलेले आहे. मुंबई महापालिका कायदा 1888 कलम 61 अन्वये रुग्ण सेवा पुरविणे महापालिकेचे मूलभूत कर्तव्य असताना पालिका रुग्णालयाचे खासगीकरण कसे करू शकते, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

…म्हणूनच विरोध

मुंबईच्या करदात्यांचे 500 कोटी रुपये खर्च करून तयार झालेले रुग्णालय केवळ 55 कोटी जंगम मालमता, 300 खाटांचे अथवा 100 खाटांचे रुग्णालय चालविण्याचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या संस्थेस निविदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. निविदेनुसार फक्त (147 खाटा) मुंबई शहर व उपनगरातील पिवळ्या/भगव्या रेशन कार्ड धारक, महापालिका कर्मचारी, नगरसेवक व पुटुंबीय यांना रुग्ण गणले जाईल. इतर रुग्णांना खासगी रुग्णालयाप्रमाणे दर आकारण्यात येईल. विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात येणार नाही.