वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसचा विरोध, लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा

केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शन चा प्रस्ताव मंजूर केला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यावरचे विधायक सादर होईल. पण काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी या प्रस्तावाच्या व्यावहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

खरगे म्हणाले की, वन नेशन, वन इलेक्शन ही व्यवहार्य नाही. निवडणूक आली की मुद्दे भरकटवण्यासाठी भाजप असे मुद्दे उचलतात असे खरगे म्हणाले. तसेच वन नेशन, वन इलेक्शन व्यवस्था संविधानाच्या विरोधात आहे. ही व्यवस्था लोकशाहीसाठी घातक आहे. ही व्यवस्था संघराज्यासाठी घातक असून देशाचे नागरिक ही व्यवस्था कधीच स्विकारणार नाही असेही खरगे म्हणाले.