निवडणूक आयोग निःपक्षपणे निवडणुका घेतोय का यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने पक्षाचे नेते आणि तज्ञांचा कृती गट बनवला आहे. एम्पॉवर्ड अॅक्शन ग्रुप ऑफ लीडर्स अॅण्ड एक्सपर्ट्स (ईगल) असे त्याला नाव देण्यात आले आहे. ‘ईगल’ विशेषकरून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेली अंदाधुंदी आणि मतदार यादीतील फेरफार याचा छडा लावणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या ‘ईगल’ची स्थापना केली आहे. त्यात काँग्रेसचे नेते अजय माकन, दिग्विजय सिंह, डॉ. अभिषेक मनू सिंघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिंग सप्पल, डॉं. नितीन राऊत, छल्ला वामशी चंद रेड्डी यांचा समावेश आहे. ही समिती सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार प्रकरणाची दखल घेईल आणि लवकरात लवकर पक्षश्रेष्ठाRना अहवाल सादर करणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील मागील निवडणुकांचे विश्लेषण करण्याच्या सूचनाही ‘ईगल’ला देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांचे सक्रियपणे निरीक्षण करण्याची जबाबदारीही या समितीवर राहणार आहे.