राहुल गांधी हे संभलमध्ये पीडितांना भेटायला गेले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणं ही भाजप -संघाची विचारसरणी अशी टीका काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केली आहे.
एक्सवर पोस्ट करून खरगे म्हणाले की, भाजप आणि संघ आपल्या विभाजनकारी अजेंड्यातून संविधानाच्या चिंधड्या करण्यात व्यस्त आहे. लोकसभेत विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना संभलमध्ये पीडित कुटुबींयाना भेटण्यासाठी रोखलं गेलं हे त्यामुळे सिद्ध झालं. दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणं ही भाजप आणि संघाची एकमेव विचारसरणी आहे. यासाठी त्यांनी प्रार्थनास्थळांचा कायदा मोडून काढला आहे आणि आपल्या द्वेषाच्या बाजाराच्या शाखा सगळीकडे उघडल्या आहेत.
भाजपा-आरएसएस अपने विभाजनकारी एजेंडे से संविधान की धज्जियाँ उड़ाने में व्यस्त है।
लोकसभा में नेता प्रतिपक्ष श्री @RahulGandhi को संभल में पीड़ित परिवारों से मिलने जाने से रोकना इसी बात को साबित करता है।
दो समुदायों में नफ़रत पैदा करना ही भाजपा-आरएसएस की एकमात्र विचारधारा है,…
— Mallikarjun Kharge (@kharge) December 4, 2024
काँग्रेस पक्ष सौहार्दता, शांतता, बंधूभाव, सद्भाव आणि प्रेमाचं दुकान उघडत आहे. आणि विविधतेत एकतेवर समाजाला एकजूट ठेवेल. आम्ही झुकणार नाही आणि मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.