काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, वायनाड पीडितांसाठी केली मागणी

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी गांधी यांनी शहा यांच्याकडे वायनाडमध्ये भुस्खलन पीडित कुटुंबीयांसाठी तत्काळ निधी देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पक्ष आणि राजकारणापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे असे गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की वायनाडमध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली त्याबद्दल अमित शहा यांना माहिती दिली. या आपत्तीत कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अशा वेळी केंद्र सरकारने जर कुठली मदत नाही दिली तर चुकीचा संदेश जाईल असे प्रियंका गांधी म्हणाल्या.