Budget 2025 – आयकर कमी केला तरी GST भरावा लागणार, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांची टीका

केंद्र सरकारने जरी 12 लाख रुपयांपर्यंते उत्पन्न करमुक्त केले असले तरी जीएसटी भरावा लागणार आहे अशी टीका काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केली. तसेच जेवढा कर माफ करण्यात आला आहे त्याच्या दुप्पट पैसे वेगळ्या मार्गातून भरावे लागणार आहे असेही तिवारी म्हणाले.

एएनायशी बोलतना तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचा आयकर माफ केला आहे, पण त्याच व्यक्तीला जीएसटी भरावा लागणार आहे. जेवढा कर माफ करण्यात आला आहे त्याच्या दुप्पट पैसे वेगळ्या मार्गातून सामान्य माणसांना भरावा लागणार आहे.

तसेच केंद्र सरकारने शिक्षणावरचा निधी कमी केला आहे आणि विकसिक भारताच्या गोष्टी करत आहेत. मनरेगा आणि ग्रामीण विकासाचा निधी कमी केली आहे. आता लोक बिहारबद्दल बोलत आहेत. बिहारला स्पेशल पॅकेज देणार होते, स्पेशल पॅकेजचा खुळखुळा दिला. असेही तिवारी म्हणाले.