
मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल दीर्घ काळ सुस्त असणाऱ्या केंद्र सरकारच्या निष्क्रियतेबद्दल काँग्रेस खासदार ए बिमोल अकोइजाम यांनी टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेश, बिहार वा तुमच्या अन्य राज्यांमध्ये अशी परिस्थिती उद्भवली असती तर त्याकडे दुर्लक्ष केले असतेत का, असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे.
मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्याच्या केंद्राच्या धोरणांवर कठोर टीका करत अकोईजाम यांनी, केंद्र सरकार मणिपूरची अवस्था अफगाणिस्तानसारखे का होऊ देत आहे, अशीही विचारणा केली. मणिपूरमध्ये साठ हजार सैन्य तैनात असताना, केंद्र सरकारने हे संकट इतक्या दिवसांत संपुष्टात आणायला हवे होते. हेच जर उत्त्तर प्रदेश, बिहार, राजस्थान किंवा मध्य प्रदेशात घडले असते तर परिस्थिती तेथे चिघळू दिली असती का? असा संताप त्यांनी व्यक्त केला.