राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, काँग्रेस नेते नितीन राऊत यांची टीका

जळगावात क्षुल्लक कारणावरून दोन गटांत वाद झाला. आणि या वादाचे रुपांतर दंगलीत झाले. यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही अशी टीका राऊत यांनी केली.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्यात सामान्य जनता जाती आणि धर्मावरून भांडत आहेत आणि राज्य सरकार त्याकडे लक्ष देत नाहिये. जनता अशा मुद्द्यांवरून भांडत राहतील आणि त्यांचे लक्ष विकासावरून उडेल. हे सरकारचं अपयश आहे असेही राऊत म्हणाले.