विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी सर्वांना सोबत घेऊन जाणाऱयाकडे नेतृत्व सोपविण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असून विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांच्या नावांचीही चर्चा आहे.