मंत्रालयात दलाल, कंत्राटदारांना मुक्त प्रवेश…सर्वसामान्यांना मनाई; वडेट्टीवार यांचा आरोप

मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव फेस रेकग्नेशन यंत्रणा बसवण्यात आली आहे. मशीनवर व्यक्तीच्या चेहऱयाची ओळख पटल्याशिवाय त्याला प्रवेश दिला जात नाही. या यंत्रणेमुळे मंत्रालयात विविध कामांसाठी येणाऱया सर्वसामान्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. दलाल आणि कंत्राटदारांना मात्र वशिल्याने मुक्त प्रवेश मिळत आहेत, असा आरोप करतानाच ही यंत्रणा बंद करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मंत्रालयात फेस रेकग्नेशनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसला आहे. मंत्री आणि आमदारांचे कार्यकर्ते गाडय़ांमधून आत प्रवेश करत आहेत आणि या यंत्रणेतून सहजपणे त्यांना प्रवेश मिळत असल्याचे ते म्हणाले.