नागपुरात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेने गाडी चालवत होता. संकेतने भरधाव वेगात अनेक गाड्यांना धडक दिली. पण नागपूर पोलीस गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाला सोडून दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर गुन्हा दाखल केला असेही वडेट्टीवार म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले की, पूर्वी गुन्हा घडला की आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी चौकशी व्हायच्या. महायुती सरकारच्या काळात बदल झाला आहे. आधी पोलिसांना बघावं लागतं, की गुन्हेगार महायुती सरकार मधील मंत्री, त्याच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मंत्र्यांना पैसे पुरवणारा धनदांडगा तर नाही ना?!यापैकी कोणी असेल तर आधी त्याला वाचवून त्यांच्या ड्रायव्हर, काम करणारा कर्मचारी किंवा मित्र म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर गुन्हे दाखल केले जातात.
महायुती सरकारच्या काळात गृहखात्याने बनवलेला हा पॅटर्न काल पुन्हा चालला तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलासाठी असेही वडेट्टीवार म्हणाले.
नागपूर मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गाडी मुलगा चालवत होता, मुलाच्या नावावर गाडी आहे इतकं सर्व स्पष्ट असूनही पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाला सोडून दुसऱ्याच्या नावावर गुन्हा दाखल केला असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
तसेच ज्याच्या नावावर गाडी आहे, जो गाडी चालवत होता त्याच्या नावावर गुन्हा दाखल होत नाही ? असा सवाल त्यांनी विचारला.
पुण्याच्या पोर्शे प्रकरणात दोन निष्पाप युवक युवतीचे जीव गेले होते. त्या घटनेचा गृहमंत्री आणि गृहविभागाला कोणताही पश्चाताप झाला नाही. आता परत नागपूर पोलिसांचे वागणे स्पष्ट दाखवते या राज्यात पोलिस हे गुन्हेगारांना लपविण्यासाठी, वाचवण्यासाठी काम करते, न्यायासाठी नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.
‘गुन्हेगारांना संरक्षण देणारे राज्याचे गृहखाते‘
पूर्वी गुन्हा घडला की आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी चौकशी व्हायच्या. महायुती सरकारच्या काळात बदल झाला आहे.
आधी पोलिसांना बघावं लागतं, की गुन्हेगार महायुती सरकार मधील मंत्री, त्याच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मंत्र्यांना पैसे… pic.twitter.com/pJwiOB7TgZ— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 10, 2024