मोहन भागवत यांचं विधान देशद्रोही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात

राम मंदिर झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. हे विधान म्हणजे प्रत्येक भारतीयाच अपमान आहे आणि हे विधान देशद्रोही आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

दिल्लीत इंदिरा भवनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत दर दोन तीन दिवसांनी काही तरी विधानं करतात. या विधानातून त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाबाबत आणि संविधानाबाबत काय वाटतं हे कळतं.

तसेच काल भागवतांनी जे विधान केलं ते देशद्रोही विधान आहे. स्वातंत्र्य आंदोलन आणि संविधान अमान्य आहे असा त्यांच्या विधानाचा अर्थ होते. हेच विधान दुसऱ्या एका देशात कुणी केलं असतं तर त्यांना अटक केली असती आणि त्यांच्यावर खटला चालवला असता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. वेळ आली आहे की अशा बकवास गोष्टी ऐकणं आपण बंद केले पाहिजे. कारण त्यांना वाटतं की लोक फक्त ओरडत राहतील असेही गांधी म्हणाले.