P Chidambaram चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, काँग्रेसच्या बैठकीत आली भोवळ

अहमदाबाद येथील साबरमती आश्रममध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णासलयात दाखल करण्यात आले. उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन तब्बल 64 वर्षानंतर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 7 एप्रिलला सुरू झालेले हे अधिवेशन 9 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या माजी अध्य़क्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी व पी चिदंबरम तसेच इतर ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.

मंगळवारी चिदंबरम हे आश्रमात फिरत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून नेत रुग्णालयात दाखल केले.