सत्ताधारी देशात द्वेष पसरवत असल्याने नवसत्याग्राहाची गरज, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान

बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले आहे. या अधिवेशनाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. सत्ताधारी देशात द्वेष पसरवत असल्याने नवसत्याग्राहाची गरज आहे असे मत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले.

जयराम रमेश म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी इथूनच काँग्रेचे अधिवेशन भरले होते. आज आम्ही नवसत्याग्रह बैठक आयोजित केली आहे. देशातले सत्ताधारी द्वेष पसरवत आहेत म्हणून देशाला नवीन सत्याग्रहाची गरज आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असो वा नसो ने नेहमीच या देशाला एकसंध ठेवले आहे. प्रत्येक समाजाची काळजी घेतली आहे. काँग्रेसचा इतिहास हा देशाचा इतिहास आहे असेही डीके शिवकुमार म्हणाले