
मुंबई, ठाणे महापालिकांसह इतर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक गेल्या 3 वर्षांपासून लटकल्या आहेत. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “राज्यात देवेंद्र फडणवीसांना सत्ता हातात हवी आहे, या हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.”
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, “140 कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे. म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. पण भाजपाला विशेषतः राज्यात देवेंद्र फडणवीसांना सत्ता हातात हवी आहे आणि या हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.”