2 कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख; पेट्रोल 40, डिझेल 35 रुपये लिटर करण्याच्या ‘सौगात’चं काय झालं?

नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकावर अत्याचार झाले, त्यांचे मॉब लिंचिंग झाले, ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे असे तत्कालीन परिस्थितीत म्हटले गेले. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. पुढे राजकारण करत असताना अल्पसंख्याक सामाजाला एकही तिकीट न देणे, एकही मंत्रीपद न देणे, मोदींच्या पक्षातील आणि त्यांच्या मातृसंस्थेतील सहकाऱ्यांनी या समाजावर अत्यंत खालच्या भाषेत अपमानजनक वक्तव्ये व अत्याचार केले. हे सर्व पाहता ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’, असे आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ईद निमित्त भारतीय जनता पक्ष 32 लाख मुस्लीम कुटुंबाला ‘सौगात-ए-मोदी’ कीट देणार असल्याच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर खरमरीत टीका केली. ही ‘सौगात’ देत असताना दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार, पेट्रोल 40 रुपये तर डिझेल 35 रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने 2014 साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘कालपर्यंत मुसलमानांविषयी विखारी भाषणं देणारे आज ‘सौगात-ए-मोदी’ करताहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल