ही महायुती नाही तर ही तर भ्रष्टयुती, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

भाजपने दोन पक्ष फोडले, ही महायुती नाही तर भ्रष्टयुती आहे अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

थोरात म्हणाले की, बाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. हे पक्ष फोडताना भाजपने जी साधन संपत्ती वापरली ती भ्रष्ट मार्गाने मिळवली होती. त्यामुळे ही महायुती नसून भ्रष्टयुती आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.