‘अदानी’च्या वीज दरवाढीला काँग्रेसचा विरोध

ऐन उन्हाळ्यात अदानी कंपनीने केलेल्या वीज दरवाढीला काँग्रेसने विरोध केला आहे. झोपडपट्टीत राहणारे गरीब, कष्टकरी जनतेसह मध्यमवर्गीय कुटुंबाला वीज दरवाढीची झळ बसणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होत असल्याने पंखे, एसी, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचदरम्यान दरवाढ करून अदानी कंपनीने सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. ही वीज दरवाढ कमी करून स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.