विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देताना काँग्रेसने मावळत्या विधानसभेतील श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि गोंदिया जिह्यातील आमगावचे आमदार सहसराम कोरोटे या दोघांना तिकीट दिलेले नाही. मुंबईत कांदिवली, चारकोप आणि सायन-कोळीवाडा या मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने घोषित केले आहेत.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसने घोषित केलेल्या अधिकृत जागांची संख्या आता 71 इतकी झाली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी अपात्रतेची कारवाई झाल्याने काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांची पत्नी अनुजा केदार यांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला गोंदिया जिह्यातील अर्जुनी-मोरगाव हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे घेतला असून येथून माजी आमदार दिलीप बनसोड यांना संधी दिली आहे. तर यवतमाळ जिह्यातील राळेगाव मतदारसंघातून माजी मंत्री वसंतराव पुरके यांना उमेदवारी मिळाली आहे. अर्णी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे यांना तिकीट देण्यात आले आहे. विद्यमान आमदार पैलाश गोरंट्याल यांना जालनामधून उमेदवारी मिळाली आहे.
कांदिवलीमधून काळू बढेलिया, चारकोपमधून यशवंत जयप्रकाश सिंह आणि सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून गणेश कुमार यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. वसई विधानसभा मतदारसंघातून विजय गोविंद पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
भुसावळ ः डॉ. राजेश मनवटकर, जळगाव जामोद ः स्वाती वाकेकर, अकोट ः महेश गणगणे, वर्धा ः शेखर शेंडे, सावनेर ः अनुजा सुनील केदार, नागपूर दक्षिण ः गिरीश पांडव, कामठी ः सुरेश भोयर, भंडारा ः पूजा गणेश ठवकर, अर्जुनी-मोरगाव ः दिलीप बनसोड, आमगाव ः राजकुमार पुरम, राळेगाव ः वसंत पुरके, यवतमाळ ः अनिल मांगुळकर, अर्णी ः जितेंद्र शिवाजीराव मोघे, उमरखेड ः साहेबराव कांबळे, जालना ः कैलाश गोरंट्याल, संभाजीनगर पूर्व ः मधुकर देशमुख, वसई ः विजय गोविंद पाटील, कांदिवली ः काळू बढेलिया, चारकोप ः यशवंत जयप्रकाश सिंह, सायन-कोळीवाडा ः गणेश कुमार यादव, श्रीरामपूर ः हेमंत ओगले, निलंगा ः अभयकुमार साळुंखे, शिरोळ ः गणपतराव पाटील.