
लोहशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मुंबईत स्मारक व्हावे ही मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. जयंती व पुण्यतिथीला अण्णा भाऊ साठेंच्या कार्याची आठवण करत स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या जातात, अण्णाभाऊंच्या मुंबईतील स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारला मुहूर्त कधी सापडणार, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
मुंबईत अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य घाटकोपरमधील चिरागनगर झोपडपट्टीत होते. या चिरागनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना अण्णाभाऊ साठे यांच्या घराचे जतन करून तेथे त्यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना 2019 मध्ये पुढे आली. त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. अण्णाभाऊंचे हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी राजहंस यांनी केली आहे.