विधानसभेत अमीन पटेल काँग्रेसचे उपनेते; अमित देशमुख मुख्य प्रतोदपदी, सतेज पाटील विधान परिषदेतील गटनेते

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी काँग्रेसने विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची तर मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती केली. काँग्रेसने विधिमंडळ पक्षाची जबाबदारी तरुण नेत्यांवर सोपवली आहे.

काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे, तर विधिमंडळ नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता काँग्रेसच्या विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची, सचिवपदी डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषपुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधान परिषदेत गटनेतेपदी  सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.