माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी कट? काँग्रेस नेत्याने जारी केला व्हिडीओ

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील अंत्यसंस्कारावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपने मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी कट रचला होता असा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस नेते दीपक खत्री यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेच्या गाडीचा वेग मुद्दाम वाढवला गेला. खत्री यांनी आरोप केला आहे की इथेही कट? मनमोहन सिंग यांचे पार्थिव नेणाऱ्या गाडीचा स्पीट मुद्दाम वाढवला गेला कारण अंत्ययात्रेसाठी आलेले लोक मागेच राहतील. ही बाब अपमानजनक असून निषेधार्ह आहे.

या व्हिडीओमध्ये मनमोहन सिंग यांचे पार्थिव ज्या गाडीत ठेवले होते त्या गाडीत उभे असलेले काही गार्ड म्हणत होता की उपेंद्र साहेब गाडीचा स्पीड वाढवा. तेव्हा समोरून आवाज येतो की हो स्पीड वाढवतो म्हणून.