काँग्रेसचे 21 बंडखोर उमेदवार पक्षातून निलंबित

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात 16 मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या 21 बंडखोरांना काँग्रेसने आज पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या सूचनेवरून आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

कोपरी पाचपाखाडीमनोज शिंदे आणि सुरेश पाटीलखेडे, राजापूरअविनाश लाड, रामटेकराजेंद्र मुळक, यवतमाळशबीर खान, उमरखेडविजय खडसे, आरमोरी विधानसभा मतदारसंघआनंदराव गेडाम आणि शिलु चिमुरकर, गडचिरोलीसोनल कोवे आणि भरत येरमे, बल्लारपूरअभिलाषा गावतुरे आणि राजू झोडे, भंडाराप्रेमसागर गणवीर, अर्जुनी मोरगावअजय लांजेवार, भिवंडीविलास पाटील आणि आसमा जव्वाद चिखलेकर, मीरा भाईंदरहंसकुमार पांडे, कसबा पेठकमल व्यवहारे, पलूस कडेगावमोहनराव दांडेकर, नगर शहरमंगल विलास भुजबळ यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.