माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार

चेंबूरच्या माहुलमधील प्रकल्पग्रस्तांची घरे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्यास पालिका तयार आहे. मात्र, असे असूनही या घरांसाठी 15 मार्चपासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांकडून केवळ 199 अर्ज आले आहेत. त्यामुळे आता नाईलाजाने या घरांसाठी आणखी काही अटी शिथील करण्याचा विचार पालिका करत आहे.

माहुलमधील प्रकल्पबाधितांची तब्बल 13 हजार घरे अजूनही रिकामे असून ही घरे पालिकेच्या सफाई पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाख 60 हजार रुपये किमतीत द्यायला पालिका तयार आहे. मात्र, एवढय़ा स्वस्तात घरे उपलब्ध असतानाही आतापर्यंत केवळ 199 अर्ज आले आहेत. कमी प्रतिसादामुळे आता पालिकेकडून मुदत वाढवली जाणार असून काही अटीही शिथील केल्या जाणार आहेत.

n अर्जासाठी मुदत वाढवली जाणार असून कर्मचाऱ्यांना म्युनिसिपल बँकेचे 90 टक्के कर्ज दिले जाणार आहे. त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. मुंबईत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घरांसाठी अर्ज करता येणार आहे.