बुलेट ट्रेनसाठी बांधकाम सुरू असताना पुल कोसळला; तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले

गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा पूल बांधकाम सुरू असतानाच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर घटनेत तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले असून एका मजुराला वाचवण्यात यश आले आहे.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना गुजरातमधील आणंद येथे संध्याकाळी माही नदीवर घडली आहे. बुलेट ट्रेनसाठी पुलाचे बांधकाम सुरू असतानाच अचानक पुल कोसळला. या दुर्घटनेत तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकमध्ये दबले असून एका मजुराची सुटका करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच आणंद पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.