म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2147 घरे आणि 110 भूखंडांच्या विक्रीकरिता बुधवारी दुपारी 1 वाजता ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात संगणकीय सोडत पार पडणार आहे. 2147 घरांसाठी जवळपास 30 हजार अर्ज आले असून त्यातील 19 हजारांहून अधिक जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.
कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या घरे व भूखंड विक्रीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 11 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली होती.